Shirurkasar Flood: महापुरानंतर बेपत्ता; शिरूरकासार तालुक्यातील ६९ वर्षीय नागरिकाचा चौथ्या दिवशीही काहीसा ठावठिकाणा नाही
Missing Senior Citizen: शिरूरकासार तालुक्यात सोमवारी आलेल्या महापुरामुळे गणपत हरिभाऊ बर्ड (वय ६९) सांडव्यावरून वाहून गेले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण जाधव यांच्या पथकासह स्थानिक व अग्निशामक दल शोधमोहीम राबवत आहे.