Beed News
sakal
मराठवाडा
Beed News: केज तालुक्यात हृदयद्रावक घटना; घरासमोरील खड्ड्यात पडून सात वर्षीय मुलीचा मृत्यू
Child Drowning: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घराशेजारील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून सात वर्षांच्या आर्या बजगुडे हिचा मृत्यू झाला. खेळताना झालेल्या या अपघाताने चिंचोली माळी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
केज (जि. बीड) : घराशेजारी केरकचऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून शालेय मुलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (ता. पाच) सायंकाळी चिंचोली माळी (ता. केज) येथे घडली.

