
केज : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला ७८ दिवस झाले, तरी फरारी कृष्णा आंधळेला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी शासनाकडे करण्यात आलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर ठरल्याप्रमाणे देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. २५) मस्साजोग येथील महादेव मंदिर परिसरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास राज्यातील मराठ्यांशी गाठ असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी दिला.