Jalna News : जालना शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली ठार
Dog Attack : जालना शहरातील गांधी नगर भागात मंगळवारी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षांची संध्या पाटोळे या चिमुकलीचा मृत्यू झाला. नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे.
जालना : शहरातील गांधीनगर येथे मंगळवारी (ता.सहा) मोकाट श्वानाच्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकली ठार झाली आहे. संध्या प्रभुदास पाटोळे (वय 8 ) असे या चिमुकलीचे नाव आहे.