
भोकरदन/पारध : वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करणे मुलांचे कर्तव्य असते. शासनाने यासंदर्भात स्पष्ट निर्देशसुद्धा दिले आहेत. मात्र, भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील एका निराधार ८० वर्षांच्या महिलेला तिच्या नातवाने मारहाण करत घराबाहेर हाकलले व जिवे मारण्याची धमकी दिली.