अबब...‘या’ जिल्ह्यात लाच घेणारे ८५ जण जाळ्यात

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

नांदेड विभागात नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वाधिक लाचेचे सापळे नांदेड जिल्ह्यात करण्यात आले. जिल्ह्यात ३१ शासकीय अधिकारी व कर्मचारी अडकले. त्याखालोखाल लातूर जिल्ह्याचा क्रमांक येतो.

नांदेड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड कार्यालयातर्फे जानेवारी २०१९ ते १५ जानेवारी २०२० पर्यंत विविध विभागांतील ८५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. त्यात महसूल विभाग अव्वल, तर पोलिस विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

महिला अधिकारीही आघाडीवर
कुठलेही शासकीय काम हे संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही तरी दिल्याशिवाय होत नाही, असा जवळपास सर्वांचाच अनुभव आहे. मात्र, त्यातही काही अधिकारी, कर्मचारी निरपेक्ष भावनेने काम करतात. काही ठिकाणी शासकीय यंत्रणेत वेगवेगळ्या प्रकारचा हस्तक्षेप आणि गैरव्यवहार वाढला आहे. शासकीय, निमशासकीय विभागासोबतच काही ठिकाणी खासगी व्यक्तीही अनेक वेळा लाचेच्या जाळ्यात अडकतात. भ्रष्टाचारात पुरुषांसोबत महिलांही मागे नाहीत. 

हेही वाचलेच पाहिजेगावच्या वेशीतच निधी खर्चाला घरघर!

सर्वांनी प्रयत्न करायला हवेत
लोकसेवकांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात घेतलेल्या कुठल्याही वस्तूचा वापर करणे म्हणजे भ्रष्टाचार होय. या भ्रष्टाचाराला आळा घालविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. नांदेड विभागामध्ये नांदेड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुख्य कार्यालय असल्याने तक्रार येताच त्यावर कारवाई होत असल्याने अनेक वेळा लोकसेवकाला वाचण्यासाठी थोडा अवधीही मिळत नाही आणि तो अलगद या लाचेच्या जाळ्यात अडकतो.

 

नांदेड जिल्ह्यातील सापळे
महूसल - आठ, पोलिस - पाच, वन विभाग - दोन, जिल्हा परिषद - चार, आरोग्य - एक, महिला व बालकल्याण - दोन, नगररचना, जलसंपदा, दिव्यांग, वित्त आणि खासगी प्रत्येकी एक.
27
लातूर जिल्ह्यातील सापळे
महसूल - आठ, पोलिस - तीन, नगरविकास - तीन, सहकार - दोन आणि शिक्षण, आरोग्य, भूमीअभिलेख, समाज कल्याण, जिल्हा परिषद, महावितरण प्रत्येकी एक.
22
परभणी जिल्ह्यातील सापळे
महसूल - तीन, पोलिस - तीन, जिल्हा परिषद - दोन आणि आरोग्य, भूमीअभिलेख, शिक्षण, गृहखाते, नगरविकास, जलसंपदा आणि खासगी प्रत्येकी एक.
15
हिंगोली जिल्ह्यातील सापळे
महसूल - दोन, पोलिस - दोन, जिल्हा परिषद - तीन, खासगी - दोन आणि कृषी, ग्रामविकास प्रत्येकी एक.
11

हेही वाचले पाहिजेचार्टनंतरही रेल्वेत मिळवा जागा : कशी ते वाचलेच पाहिजे

‘एसीबी’कडून नागरिकांना आवाहन
शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करत असल्याची तक्रार किंवा माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दियावी. लाच घेणे व देणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.
- अर्चना पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, एसीबी, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 85 officers taking bribe in 'this' district: read what district they are