अक्षय तृतीयानिमित्त कोरोना बाधीत रुग्णांना रसाची मेजवानी; जिंतूर बाजार समितीचा उपक्रम

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शासकीय तंत्रनिकेतन येथील मुलींच्या वसतीगृहात १०० बेडचे कोरोना सेंटर उभे करण्यात आले.
रसपोळी जेवन
रसपोळी जेवन
Updated on

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने (Jintur apmc covid center) उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये अक्षय तृतीयानिमित्ताने रुग्णांना सणाचा आनंद (tasty lunch) घेता यावा यासाठी आमरसाचे जेवण देण्यात आले. (A feast of juice to corona-infected patients on the occasion of Akshay III; Initiative of Jintur Market Committee)

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शासकीय तंत्रनिकेतन येथील मुलींच्या वसतीगृहात १०० बेडचे कोरोना सेंटर उभे करण्यात आले.

हेही वाचा - किनवटमधील झळकवाडी पाझर तलावाची दुर्दशा; तलावात पाण्याचा थेंब नाही, बांध झाडाझुडपांनी वेढला

सध्या याठिकाणी कांही रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना आजारात रुग्णांना मानसिक धीर देणे गरजेचे असते व आपल्या नातेवाईकांचा आधार मिळणे आवश्यक आहे. म्हणून बाजार समितीचे मुख्य प्रशासक मनोज थीटे हे स्वतः जबाबदारी घेऊन कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना घरच्या नातेवाईकांची कमी भासू नये यासाठी लक्ष ठेऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन धीर देण्याचे काम करत आहेत.

ग्रामीण भागात अक्षय तृतीया निमित्ताने घरोघरी आमरसाच्या जेवणाचे आयोजन करण्यात येत असते, म्हणून कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आमरसाचा आस्वाद घेता यावा यासाठी आमरसाचे जेवण देण्यात आले. यावेळी रुग्णांना घरच्या जेवणाची आठवण झाली असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com