esakal | जालना जिल्ह्यात झालेल्या दुचाकी अपघातात जिंतूर तालुक्यातील मजूर ठार

बोलून बातमी शोधा

जिंतूर अपघात

जालना जिल्ह्यात झालेल्या दुचाकी अपघातात जिंतूर तालुक्यातील मजूर ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील मालेगाव तांडा येथील ३५ वर्षीय मजूर औरंगाबादहुन गावी येत असताना जालना जिल्ह्यातील नेर टोलनाक्याजवळ झालेल्या दुचाकी व ट्रकच्या अपघातात जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा येथील शंकर रुस्तुमराव राठोड (वय ३५ ) हा औरंगाबाद येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. दरम्यान तो कामानिमित्त आपल्या गावाकडे जाण्यासाठी रविवारी रात्री दुचाकी (एमएच-२२ एएस- ५०६८) वरून एकटाच जिंतूरकडे येत होता. यावेळी त्याची दुचाकी जालना जिल्ह्यातील नेर टोलनाक्याजवळ एका चारचाकी वाहनाला पाठी मागून धडकली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. प्रवासी, नागरिकांनी व जालना पोलिसांनी त्यास घटनास्थळाहून जालना येथे रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. मंगळवारी नातेवाईकांनी त्याचा मृतदेह गावी आणला. अपघातग्रस्त युवकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे