
कुंभार पिंपळगाव : हीच व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।। पंढरीचा वारकरी।।वारी चुकू न दे हरी।।
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणेच वयाच्या अकराव्या वर्षापासून मासेगाव (ता. घनसावंगी) येथील तळ्यातील मारुती संस्थानचे बळिराम महाराज माघाडे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत पायी वारी केली. वृद्धापकाळाने गेल्या तीन वर्षांपासून ते वारीत नसले तरी त्यांची पायी दिंडी निघते. पायी चालता येत नसले तरी आजही आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन घेतात.