
सोनपेठ (जि. परभणी) : तालुक्यातून जात असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध होत आहे. मात्र, सायखेडा (ता. सोनपेठ) येथे सोमवारी (ता. २१) शेतकऱ्यांचे वेगळेच रूप अधिकाऱ्यांना दिसले. जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी सन्मानाने, विनंतीपूर्वक जेऊ घातले. नंतर ‘आमच्या मुलाबाळांच्या पोटचा घास हिरावून घेऊ नका’, अशी विनंती केली.