RakshaBandhan 2025: दुहेरी योग... नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन; महिलांची बाजारपेठेत राख्या, भेटवस्तू खरेदीसाठी लगबग
Narali Poornima: यंदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन सण आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला एकत्र साजरे होणार आहेत. त्याच्या अनुषंगाने महिलांमध्ये खरेदीची धांदल सुरू आहे, आणि धार्मिक महत्त्वावरही चर्चा होऊ लागली आहे.
माजलगाव : यंदा पंचांगानुसार नारळी पौर्णिमा आठ ऑगस्टला, तर रक्षाबंधन नऊ ऑगस्टला साजरे होणार आहे. श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखीपौर्णिमा साजरी केली जाते.