Beed News : खुल्या प्रवर्गातील पावणेतीन लाख कुटुंबांचे होणार सर्वेक्षण

एका कुटुंबाची दीडशे प्रश्नांच्या अधारे माहिती; ॲपच्या माध्यमातून गोळा होणार माहिती
beed
beedsakal

बीड : शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपवले आहे. त्यानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील मराठा तसेच सर्वच खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली. यासाठी ३४७९ प्रगणकांची नेमणूक केली आहे. पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे या जिल्हास्तरावर नोडर ऑफीसर असून सहाय्यक नोडल ऑफीसर म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी असतील. तालुकास्तरावर तहसिलदार, शहरी भागात नगरपालिका, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी नोडल ऑफीसर असतील. यासाठी दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना पुणे येथे प्रशिक्षणही दिले जाणार. जिल्हास्तरावर विविध जुन्या दस्तऐवजातून कुणबी नोंदी शोधल्या. जिल्ह्यात १३ हजारांवर कुणबी - मराठा, मराठा - कुणबी, मराठा जात अशा नोंदी आढळल्या. शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपवले.

त्यानुसार पुणे येथील गोखले इन्स्टीट्युटमधून शहर, ग्रामीण भागातील मराठा समाजासह सर्वच खुल्या समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाचे काम पंधरवाड्यात पूर्ण करावयाचे असले, तरी अद्याप याचे प्रशिक्षण झाले नाही. या सर्वेक्षणात मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील एका कुटूंबाची १५० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती घेऊन ती माहिती अॅपवर ऑनलाईन नोंदली जाणार आहे. जिल्ह्यातील ३४७९ तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांची प्रगणक म्हणून नेमणूक केली आहे.

१३ लाख ६६ हजार लोकसंख्या

दरम्यान, जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येत मराठा समाजासह खुल्या प्रगर्वाची लोकसंख्या १३ लाख ६६ हजार ६४७ येवढी आहे. एका कुटूंबात साधारण पाच व्यक्ती गृहीत धरल्या तर खुल्या प्रवर्गाचे कुटूंब दोन लाख ७३ हजार ३२९ येवढी आहे.

प्रश्नावलीकडे समाजाचे लक्ष

दरम्यान, १५० प्रश्नांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाणार असले तरी यातील प्रश्न नेमके काय, याकडे मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचे लक्ष लागले आहे.

जात प्रमाणपत्राच्या नोंदी संकेत स्थळावर

बीड, ता. ५ : जिल्ह्यामध्ये अभिलेख्यांच्या तपासणीअंती कुणबी - मराठा, मराठा - कुणबी व कुणबी इत्यादी नोंदी आढळून आलेले मराठी भाषेतील अभिलेखे, सदर अभिलेख्यांमधील मोडी, उर्दू भाषेतील अभिलेखे ही मराठी भाषेत भाषांतरित करून या जात प्रमाणपत्रांच्या नोंदी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अद्यायवत केल्या. beed.gov.in या संकेतस्थळावर या नोंदी अपलोड करून नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. मराठा समाजातील पात्र व्यक्तींनी मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याच्या अनुषंगाने संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.

खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनानने ३४७९ प्रगणकांची नेमणूक केली आहे. सर्वेक्षणासाठीचे ॲप तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

— शिवकुमार स्वामी,

निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक नोडल ऑफीसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com