
कळंब : तालुक्यातील खामसवाडी येथे दुखदायक घटना घडली आहे.10 वी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका ऐकूलत्या एक 16 वर्षे वय असलेल्या मुलाचा सर्पदंशमुळे मृत्यू झाला आहे.सर्पदंश मुळे मृत्यू झालेल्या मुलाचे ओंकार सुनील शेळके असे नाव आहे.काही वर्षापूर्वी त्याच्या वडीलचे निधन झाले होते. त्या दुःखातून अजूनही कुटुंबिय सावरलेले नाही. त्यात आणखीन ऐकूलत्या एक मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे खामसवाडी येथील शेळके कुटुंबावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळ्याने गावात हळहळ व्यक्य होत आहे.