APAAR ID
sakal
निलंगा - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ अर्थात ‘अपार’ आयडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर निलंगा तालुक्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणी प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत ४३ हजार ३६४ विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मात्र, आधार कार्डमधील माहिती विसंगतीमुळे तब्बल ७ हजार ८३४ विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे.