

Aaditya Thackeray Farmer Meeting in Gangapur Farmers Raise Questions Over 5000 Drought Aid and Finance Company Loan Recovery
esakal
कायगाव: दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरू आहे. बुधवारी (ता.४)रोजी दुपारी १२ वाजता अहिल्यानगरकडे जाताना त्यांनी गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे थांबून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. भेंडाळा गावात दाखल होताच आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.