
पंढरपूर/लातूर : लातूरमधून अपहरण झालेला तीन वर्षांचा मुलगा शुक्रवारी (ता. सहा) सायंकाळी येथे सापडला. येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तब्बल ११ दिवसांनी तो आईच्या कुशीत विसावला. आई-वडिलांना त्रास देण्याच्या उद्देशाने आरोपीने त्या मुलाचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.