esakal | सिल्लोड : शिवसेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul sattar, Prabhakar Palodar

शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना चौथ्या फेरीअखेर 19 हजार 706 मतांची आघाडी घेतली. या ठिकाणी अपक्ष उमेदवार प्रभाकर प्रभाकर पालकर  10 हजार 923 मते घेऊन दुसऱया स्थानी आहेत.

सिल्लोड : शिवसेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर | Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड (जि. औरंगाबाद) - शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना चौथ्या फेरीअखेर 19 हजार 706 मतांची आघाडी घेतली. या ठिकाणी अपक्ष उमेदवार प्रभाकर प्रभाकर पालकर  10 हजार 923 मते घेऊन दुसऱया स्थानी आहेत.

जिल्ह्यात सर्वांत कमी उमेदवार व मतदानाचा टक्का वाढलेला हे सिल्लोड मतदारसंघाचे वैशिष्ट्य ठरले. यामुळे सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत बघावयास मिळाली.  शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार, अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांच्यात खरा राजकीय  सामना रंगला असताना, वंचित बहुजन आघाडी किती मतांचा पल्ला गाठते
याकडेही मतदारांचे  लक्ष लागले आहे.

विधानसभेसाठी एकूण मतदान तीन लाख सोळा हजार 378 एवढे असताना,  74.83 मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये एक लाख 27 हजार 443 पुरुषांनी तर एक लाख नऊ  हजार 293 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. असे एकूण दोन लाख 36 हजार 736  मतदान झाले आहे. सिल्लोड शहरामध्ये संध्याकाळपर्यंत 79.65 टक्के मतदानाची नोंद झाली  आहे.

शहरातील 49 मतदान केंद्रांवर असलेल्या 46 हजार 44 पैकी 30 हजार 663  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या नगर परिषदेच्या  निवडणुकीमध्ये 70.93 टक्के मतदान झाले होते. आता शहरातच नगर परिषदेच्या तुलनेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी नऊ टक्के मतदानाचा वाढलेला टक्का अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांना अडचणीचा ठरणार का?, त्याचबरोबर ग्रामीण भागात वाढलेली मतदानाची टक्केवारी अब्दुल सत्तार यांना अडचण निर्माण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे शिवसेना उमेदवार अब्दुल सत्तार, अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांच्यामध्ये होणारी लढत चुरशीची, अटीतटीची बनली आहे. 
 

 
 

loading image