
सिल्लोड-सोयगाव : विधानसभा मतदारसंघातील विजयाने तालुक्यातील जनतेने दिलेला कौल बघता दोन्ही उमेदवारांच्या पारड्यात मतदारांनी जवळपास सारखी मते टाकली तरी या अटीतटीच्या लढतीत अखेर अब्दुल सत्तार यांनी काठावर बाजी मारली. सिल्लोड विधानसभेतील विजयाचा रथ चौथ्यांदा अब्दुल सत्तार यांनी कायम ठेवत विजय मिळविला.