
लातूर : आभा हेल्थ कार्ड म्हणजे आरोग्याची कुंडली. या कार्डमध्ये रुग्णांची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते. या कार्डच्या मदतीने डॉक्टर रुग्णांची संपूर्ण आरोग्याच्या माहिती मिळवू शकतात. आजवर लातूर जिल्ह्यातील ११ लाख २ हजार ६६५ जणांनी आभा नंबर मिळवला असून त्यांची ‘आरोग्याची कुंडली’ एका ‘क्लिक’वर पहायला मिळणार आहे.