MPSC Exam : अभिजीत जाधव याचे एमपीएससी परीक्षेत यश; अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून झाली निवड

ग्रामीण भागात शिक्षण घेणारा विद्यार्थी अभिजीत जाधव याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवून मोठे यश साधले आहे.
Abhijit Jadhav
Abhijit Jadhavsakal
Updated on

- अशोक चांगले

सुखापुरी - अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील दहिगाव येथील ग्रामीण भागात शिक्षण घेणारा विद्यार्थी अभिजीत जाधव याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवून मोठे यश साधले आहे.

अंबड तालुक्यातील दहेगाव खुर्द येथील अभिजीत जाधव याने सरकारी पदांवर निवड मिळवून आपल्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव उंचावले आहे. अंबड तालुक्यातील संदीपान जाधव यांचा मुलगा अभिजीत जाधव याची एमपीएसी परीक्षेत अन्नसुरक्षा अधिकारी (एफएसओ) म्हणून निवड झाली आहे.

अभिजीतचा शैक्षणिक प्रवास ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतून सुरू झाला. त्याने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण दहेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेतले, तर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जालना येथील पार्थ सैनिकी स्कूलमध्ये झाले.

अभिजीतने बीएससी शिक्षण सरस्वती भवन महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून पूर्ण केले. त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या अथक परिश्रमाला, जिद्दीला आणि चिकाटीला जाते. या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com