Ashadhi Wari 2025 : ‘भाग गेला, शिण गेला, अवघा झालासे आनंद’; सेलू येथील अभिमन्यू जाधव यांची तीन दशकांपासून पंढरीची वारी
Pandharpur Wari : गेवराई तालुक्यातील सेलू येथील अभिमन्यू जाधव हे वयाच्या सत्तरीतही पंढरीची वारी अत्यंत भक्तिभावाने करत आहेत. गेली तीस वर्षे त्यांनी पायी वारीत सातत्य राखले असून, विठ्ठलभेटीची ओढ आजही तितकीच तीव्र आहे.
गेवराई : मागील तीन दशकांपासून सेलू (ता. गेवराई) येथील अभिमन्यू जाधव हे पायी वारी करत आहेत. प्रारंभी काही वर्ष ते लबडे महाराज तर आता सोजे महाराज माली पारगाव यांच्या दिंडीत सहभागी होत आळंदी ते पंढरपूर पायी वारीत सहभागी होत आहेत.