
औसा : आपली मंत्रीपदावर वर्णी लागावी यासाठी अनेक जण देव पाण्यात घालून मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. कोणाकडून कशी फिल्डिंग लावावी यासाठी जीवाचे रान करीत आहेत. पण औशाचे आमदार ही फिल्डिंग सोडून मतदारसंघात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला भेटून त्यांचे अश्रू पुसून धीर देत आहेत.