Corona Updates : मराठवाड्यात कोरोनाचे नवे १०५६ रुग्ण

Corona Updates : मराठवाड्यात कोरोनाचे नवे १०५६ रुग्ण
Updated on
Summary

औरंगाबाद जिल्ह्यात १५७ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील ६७, ग्रामीण भागातील ९० रुग्ण आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada Corona Updates) मंगळवारी (ता.एक) दिवसभरात एक हजार ५६ कोरोनाबाधित आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; बीड (Beed) ३६१, नांदेड (Nanded) १७७, औरंगाबाद (Aurangabad) १५७, लातूर (Latur) १०६, उस्मानाबाद (Osmanabad) ८९, जालना (Jalna) ७२, परभणी (Parbhani) ६४, हिंगोली (Hingoli) ३०. उपचारादरम्यान ५५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातुरमध्ये २१, बीड १०, उस्मानाबाद ८, औरंगाबाद ७, नांदेड ५, परभणी, हिंगोलीतील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. (Above One Thousand Covid Cases Reported In Marathwada)

Corona Updates : मराठवाड्यात कोरोनाचे नवे १०५६ रुग्ण
औरंगाबादेतील ३१ वॉर्ड होणार खुले! दिग्गजांना बसणार फटका

औरंगाबादेत १५७ नवे रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात १५७ कोरोनाबाधित (Corona) आढळले. त्यात शहरातील ६७, ग्रामीण भागातील ९० रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ८८९ वर पोचली. आणखी ४०८ रुग्ण बरे झाले. यात शहरातील १३६, ग्रामीण भागातील २७२ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ३६ हजार ४६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३ हजार २१२ जणांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला. सावरगाव (ता. कन्नड) येथील पुरुष (वय ५२), राजनगर (ता. पैठण) येथील पुरुष (७२), मुकुंदवाडीतील पुरुष (३८), गोलटगाव, शेकटा (ता. औरंगाबाद) येथील पुरुष (३०), शिरोडी खुर्द (ता. फुलंब्री) येथील महिलेचा (७०) घाटी रुग्णालयात तर एसटी कॉलनीतील पुरुष (८२) व शहरातील ६८ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आजपर्यंत ३ हजार २१४ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com