esakal | हिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग, ३२ ठिकाणी १३ हजार १९७ जणांचे लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आतापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १९७ जणांना लसीकरण करण्यात आले ज्यामध्ये १२१७ वयोवृद्धांचा समावेश आहे. 

हिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग, ३२ ठिकाणी १३ हजार १९७ जणांचे लसीकरण

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली :  जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणाला गती देण्यात आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालय अशा एकूण ३२ ठिकाणी नागरिकांना कोरोना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १९७ जणांना लसीकरण करण्यात आले ज्यामध्ये एक हजरार २१७ वयोवृद्धांचा समावेश आहे. 

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.ठोंबरे, डॉ.गोपाल कदम, डॉ.मंगेश टेहरे, डॉ. दिपक मोरे यांच्यासह रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोरोना लसीकरणाकरीता गती वाढविण्यात आली असून ३२ ठिकाणी कोरोना लसीकरण केले जात आहे.

हेही वाचाराज्यातील एमपीएससी परीक्षा पुढे ढकलू नयेत- आंबेडरवादी मिशनचे दीपक कदम

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परीचारीका  वसतीगृहात एकूण चार हजार १७१ जणांना लस दिली. नर्सी नामदेव प्राथमिक आरोग्य केंद्र १०७ , फाळेगाव केंद्र १७२ , सिरसम  केंद्रात ४४, भांडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाकरीता १६१ , कळमनुरी उपजिल्हा रूग्णालयात एक हजार ६८८, पोतरा केंद्रात १२९, वाकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात २८, मसोड प्राथमिक  आरोग्य केंद्रात १६०, आखाडा बाळापूर केंद्रात २७९, डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात १६५, रामेश्वर तांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात २६, औंढा नागनाथ ग्रामीण रूग्णालयात एक हजार पाच, शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६०, जवळा बाजार  केंद्रात १०६, पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात १४, लोहरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४४, वसमत उपजिल्हा रूग्णालयात एक हजार ४७५, कुरूंदा प्राथमिक आरोग्य केंद्रात १०५, हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात २९५, पांगरा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात ८७ , गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १६, सेनगाव ग्रामीण रुग्णालयात ६९६, गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ४९१, कोठा प्राथमिक आरोग्य केंद्रात २००, साखरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ९२, कापडसिंगी केंद्रात ८२ तर महात्मा फुले आरोग्यदायी जीवन योजनेतील खासगी रुग्णालयापैकी हिंगोलीतील स्नेहल नसींग होम ३७६, माधव हॉस्पीटल ६६१, नाकाडे हॉस्पीटल १६० जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत १३ हजार १९७ जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले . ज्यामध्ये ६० वर्षावरील एक हजार २१७ रूग्णांचा समावेश आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे