Beed Accident: अंबाजोगाई महामार्गावर आपघात, सरपंच पतीचा दर्दैवी मृत्यू

Marathwada: बीट जमादार बालाजी डप्पलवाड यांनी सदर टॅव्हल्स रेणापूर शहरात येताच आडवुन पोलीस ठाण्यात लावत चालकाला ताब्यात घेतले.
Beed Accident: अंबाजोगाई महामार्गावर आपघात, सरपंच पतीचा दर्दैवी मृत्यू
Updated on

लातुर - अंबाजोगाई महामार्गावर निवाडा पाटी जवळ खाजगी टॅव्हल्सने दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी होवुन जागीच मरण पावल्याची घटना मंगळवारी ता. ३० दुपारी ३. ४५ वाजण्याच्या सुमारास घडली. बाळकिशन हरिचंद्र मोरे वय ४९ वर्षे रा . पोहरेगाव ता रेणापूर जि लातुर असे मयत व्यक्ती चे नाव आहे.

याबाबत पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी की, बाळकिशन हरिचंद्र मोरे वय ४९ वर्षे रा . पोहरेगाव ( ता रेणापूर ) हे ३० ऑक्टोबर रोजी दुपारी दुचाकी क्र . एम.एच.२४ बी यु १७९१ वरून कामानिमित्त पोहरेगाव येथून रेणापूरकडे येत असताना दुपारी ३ .४५ वाजण्याच्या सुमारास लातुर - अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील निवाडा पाटी जवळ आले .

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com