लातुर - बार्शी रस्त्यावर कार व टेम्पोची धडक, तिघे जखमी

अमर शेख
मंगळवार, 19 जून 2018

कसबे तडवळे : लातुर - बार्शी राज्यमार्गावर कसबे तडवळे ते ढोकी दरम्यान उस्मानाबाद फाट्याजवळ इंडीका कार व टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील तीन जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (ता. 19) दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.

लातुर येथे महाविद्यालयीन प्रवेश घेण्यासाठी उस्मानाबाद येथुन चार विद्यार्थी ढोकी मार्गे इंडीका कारने (एमएच 12 सीके 4218 )लातुरकडे चालले होते. उस्मानाबाद मार्गावरुन कार लातुर - बार्शी मार्गावर  लागताच समोरून येणाऱ्या लातुरहुन बार्शीकडे जात आसलेल्या आयशर टेंम्पोची (एमएच 14 सी पी 3142) समोरासमोर धडक बसली व या कार मधील रामंचंद्र नामदेव कांबळे (रा. शिराळा ता. परंडा ), अक्षय बाळासाहेब खरात (रा. घारगाव ता. परंडा), स्मिता चौधरी (रा. भुम) हे  तीनजण जखमी झाले. या जखमींना तात्काळ ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या बाबत ढोकी पोलिस ठाण्यात आपघात नोंदणी प्रक्रिया चालू होती.

Web Title: accident car and tempo 3 injured on latur basrhi road