esakal | बीडमध्ये दुचाकींचा भीषण अपघात; दोन जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

beed accident

बीडमध्ये दुचाकींचा भीषण अपघात; दोन जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी

sakal_logo
By
निसार शेख

आष्टी (बीड): तालुक्यातील धानोरा येथील हिवरा-पिंपरखेड मार्गावरील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर एक महिला यामध्ये गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. सदरील घटना गुरुवारी (ता.२९) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. (accident news beed)

एकनाथ घोडके व त्यांच्या पत्नी संगीता घोडके (रा.वाळके वस्ती, सुलेमान देवळा) हे बॉक्सर कंपनीच्या दुचाकी वाहनाने (MH.14 Y 6252) सुलेमान देवळा येथून धानोरा येथे काही कामानिमित्त येत होते. तर गणेश बबन भोसले (रा. वाडीगव्हान, ता.पारनेर) हा युवक पल्सर कंपनीची दुचाकी (MH12 QP 4359) धानोरा येथून हिवरा पिंपरखेडच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. दोन्ही वाहने धानोरा पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाजवळ येताच एकमेकांवर जोरात आदळली. या घटनेत दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. तर संगिता घोडके या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती कळताच धानोरा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.

हेही वाचा: Corona Vaccination: अंथरुणास खिळलेल्‍या व्यक्तींना मिळणार घरीच लस

घटना एवढी भयानक होती की, दोन्ही वाहनांचा समोरील बाजूचा चक्काचूर झाला होता. मयत दोन्ही व्यक्तींच्या डोक्याला जबर मार लागल्याने रस्त्यावर रक्त मोठ्या प्रमाणावर पडले होते. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी समजताच घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले.

loading image
go to top