परभणी : 4 जणांना वाहनानं चिरडलं, मृतांमध्ये पोलीस पाटलाचाही समावेश

अपघात
अपघात sakal

मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना अज्ञात वाहनानं चिरडल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. यामधील दोन जणांचा मृत्यू झालाय. तर दोघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं बोललं जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळावर पोहचले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

परभणीमधील मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे रविवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना चिरडलं. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चौघांना चिरडून वाहन चालक फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अपघात
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी का दिला राजीनामा? ही असू शकतात कारणं

मृतांमध्ये केकरजवळा गावच्या पोलीस पाटलांचाही समावेश आहे. पोलीस पाटील उत्तम लाडाने, आत्मराम लाडाने यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर नंदकिशोर लाडाने, राधेश्याम लाडाने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com