कार अपघातात एक ठार; जळकोट तालुक्यातील घटना

शिवशंकर काळे 
Thursday, 7 January 2021

रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवाशाना सदरिल घटना पाहिल्यानंतर धावत जाऊन  देवकत्ते यांना गाडीच्या बाहेर काढून उदगीर येथे ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले

जळकोट (जि.लातूर) : धोडवाडी (ता.जळकोट) येथील एका 75 वर्षीय इसामाचा मोर्तवाडी ते घोणसी ता.जळकोट रस्तावर कार झाडावर आदळून जागीच मृत्यू झाल्याची घटना ता.सहा रोजी घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,धोडवाडी ता.जळकोट येथील सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम देवकत्ते हे लग्न सोहळा आवरुन उदगीरहून आपल्या स्वतःच्या गाव धोडवाडी ता जळकोट येथे जात असताना मोर्तवाडी ता.उदगीर व घोणसी ता.जळकोट या रस्तावर सायंकाळी चार सुमारास स्वतःच्या कारमध्ये  जात असताना अचानक गाडीचा ताबा सुटल्याने कार चिंचेच्या झाडावर आदळली आणि मोठा आवाज आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवाशाना सदरिल घटना पाहिल्यानंतर धावत जाऊन  देवकत्ते यांना गाडीच्या बाहेर काढून उदगीर येथे ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले.पंरतू देवकत्ते यांना डोक्यात  जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला होता.उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.

ग्रामीण रूग्णालयात श्वच्छतेदान करुन राञी नऊच्या दरम्यान धोडवाडी ता.जळकोट येथे आणण्यात आले. ता. 7 रोजी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून अपघात कसा झाला हे अद्याप कळू शकले नाही.त्यांच्या पश्चात सहा बहिणी,दोन भाऊ,नातवंडं असा परिवार आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident news latur One killed in a car accident