कायगाव - येवला-वैजापूर रोडवरील नांदगाव फाट्याजवळ पुलावर झालेल्या भीषण अपघातात ड्युटीवर चाललेल्या सशस्त्र सेना दलाच्या जवानासह त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला..सशस्त्र सेना दलाचे जवान सोमनाथ गोरखनाथ जाधव (वय-32, रा. अमळनेर, ता. गंगापूर) हे 13 ऑक्टोबरपर्यंत सुट्टीवर होते. सोमवारी (ता. 12) संध्याकाळी 6 वाजता हिरामण गिरीजाराम माळी (वय-43, रा. वडगाव, ता. गंगापूर) हे त्यांना मनमाड रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना पुलाजवळ हा अपघात झाला..पुलाजवळ ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेनंतर दुचाकी ट्रकखाली गेली आणि दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. दोघांना तातडीने रुग्णवाहिकेतून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले..अपघातातील ट्रक वैजापूर पोलिसांनी ताब्यात घेतला असून या घटनेचा रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. सोमनाथ जाधव हे आई-वडिलांना एकुलते एक होते. ते विवाहित असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. या घटनेने अमळनेर गावावर शोककळा पसरली आहे..3193 लोकसंख्या असलेल्या या गावातून आदिवासी समाजातील पहिला युवक म्हणून आठ वर्षांपूर्वी सोमनाथ सैन्यात भरती झाला होता. त्यास भाऊ, बहीण, वडील नाहीत, तो आईला एकटाच होता. आईने मोलमजुरीचे काम करून त्यास शिकवले व नोकरीस लावले. गरीब घरातून पुढे आलेल्या सोमनाथने जिद्द व परिश्रमाच्या बळावर सैन्यात ड्युटी मिळवली होती.उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होते.या प्रकरणी पुढील तपास बिट अंमलदार किसन गवळी हे करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.