धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी

चौकफुलीवर रस्ता ओलांडणारी दुचाकी व महामार्गावरुन सरळ जात असलेल्या दुचाकीत समोरा धडक झाल्याने एका दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना
Accident on Dhule-Solapur National Highway Biker husband and wife seriously injured police hospital
Accident on Dhule-Solapur National Highway Biker husband and wife seriously injured police hospital Sakal

आडुळ : चौकफुलीवर रस्ता ओलांडणारी दुचाकी व महामार्गावरुन सरळ जात असलेल्या दुचाकीत समोरा धडक झाल्याने एका दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.२) रोजी सांयकाळी ५:३० वाजेच्या सुमारास धुळे-सोलापुर राष्ट्रिय महामार्गावरील आडुळ ता. पैठण बायपास वरील माऊली लॉन्स जवळ घडली.

चंद्रशेखर रामनाथ ठोंबरे वय ५१ वर्षे व त्यांच्या पत्नी मनिषा चंद्रशेखर ठोंबरे वय ४५ वर्षे दोघे राहणार पिंपळगाव-पांढरी (ता.संभाजीनगर) हे मंगळवारी (ता.२) रोजी सुरमापुर (ता. अंबड) येथील नातलगाच्या कुंकवाच्या कार्यक्रमाला गेले होते.

ते परत येत असतांना आडुळ येथील आठवडी बाजार असल्याने त्यांनी गावात येवुन बाजार केला व परत पिंपळगावाला जाण्यासाठी आडुळ बायपासकडे दुचाकी क्रमांक एम एच २० इ डब्लु ०७८४ ने पिंपळगावकडे जाण्यासाठी महामार्गाला लागत होते नेमके त्याच वेळी रजापुर कडुन येणारया अज्ञात दुचाकी व यांच्या दुचाकीत जोराची धडक झाली.

यात चंद्रशेखर ठोंबरे व मनिषा ठोंबरे हे जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सुदाम तांबे, किरण ठोंबरे, अशोक ठांबरे, सिध्देश्वर ठोंबर यांनी मदतकार्य करुन जखमीला छञपती संभाजीनगर येथे हलविले. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढिल तपास ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार जगन्नाथ उबाडे, रणजित दुलत करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com