suresh jarhad
sakal
कायगाव - गंगापूर ते जुने कायगाव राज्यमार्ग रस्त्यावरील जुने कायगाव टी-पॉइंटजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सुरेश दत्तात्रय जऱ्हाड (वय २५, रा. माळेवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे मृताचे नाव आहे. शनिवारी (ता. १७) रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.