esakal | गस्तीवर असलेल्या पोलिस व्हॅनला अपघात; दोन कर्मचारी जखमी, बाळापुर- बोल्डाफाटा रस्त्यावरील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलिसातर्फे रात्रीची गस्त सुरु होती

गस्तीवर असलेल्या पोलिस व्हॅनला अपघात; दोन कर्मचारी जखमी, बाळापुर- बोल्डाफाटा रस्त्यावरील घटना

sakal_logo
By
सय्यद अतिक/ संजय कापसे

आखाडा बाळापुर ( जिल्हा हिंगोली ) : आखाडा बाळापुर ते बोल्डा फाटा रस्त्यावर रात्रीच्या गस्तीवर असलेली पोलिसांची व्हॅन पलटी होऊन दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. दोन) भल्या पहाटेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलिसातर्फे रात्रीची गस्त सुरु होती. या पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वारंगाफाटा, बोल्डा फाटा, कामठाफाटा यासह बाळापुर शहर व आदी ठिकाणी रात्रीची गस्त नियमित असते.  

सोमवारी नियमितपणे रात्रीची गस्त सुरु होती. बाळापुर, वारंगाफाटा अशी गस्त झाल्यावर सदरील पोलिस व्हॅन बाळापुर येथून बोल्डाफाटा भागात जात असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास आखाडा बाळापुरपासून जवळ असलेल्या एका वळणावर पलटी झाली. यात व्हॅनमध्ये असलेले व्हॅन चालक सुखदेव जाधव व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख जावेद हे गंभीर जखमी झाले.  

ही माहिती बाळापुर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने जखमी झालेल्या  दोन पोलीस कर्मचाऱ्यांना  बाळापुर येथे प्राथमिक उपचार करून  पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या बाबत मात्र पोलिस ठाण्यात कोणताही नोंद झाली नव्हती. जखमी पोलिसांची  प्रकृत्ती ठिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

कळमनुरीत १२ हजाराची देशी दारु जप्त, चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

कळमनुरी : येथे अवैध देशी दारुची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बारा हजार ४८० रुपयाची देशी दारु जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हात सात दिवसाची संचारबंदी लागू असताना या काळात अनधिकृतपणे  देशी दारुची वाहतूक व विक्री करताना कळमनुरी पोलिसांनी विविध ठिकाणी चार जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून पोलिसांनी देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार, ज्ञानोबा मुलगीर, रामचंद्र जाधव, सूर्यकांत भारशंकर, ए. एम. शेळके यांच्या पथकाने संतोष कुंडकर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील चार हजार ९९२ रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. अन्य घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रोयलावार व कर्मचाऱ्यांनीअसोलवाडी मार्गावर सैनिकी शाळेजवळ रामप्रसाद पोटे राहणार कळमनुरी व गजानन भुरके रा. रामवाडी यांना देशी दारुची विक्री करताना ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार हजार ९९२ रुपये किमतीची देशी दारु जप्त केली. देशी दारुच्या बाटल्या बंदच्या काळात विक्रीसाठी घेऊन जात असताना खरवड येथील किसन जयस्वाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन हजार ५९६ रुपयाच्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी या घटनेतील चारही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण १२ हजार ४८० रुपयांची देशी दारू जप्त केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image