
Latur : लातूर-नांदेड महामार्गावर अपघात, चापोलीच्या तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू
चाकूर (जि.लातूर) : लातूर-नांदेड महामार्गावरील घरणीजवळ (ता.चाकूर) भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्यामुळे चापोली येथील ४५ वर्षीय व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोमवारी (ता.१४) दुपारी घडली आहे. चापोली येथील द्वारकानाथ मद्रेवार हे सोमवारी दुपारी मोटारसायकलवरून लातूरकडे (Latur) निघाले होते. घरणी गावाच्या जवळ त्यांना (एमएच २६ बीई ७४१९) भरधाव वेगातील ट्रकने जोराची धडक दिली. (Accident Take Place On Latur Nanded Highway, Young Trader Died)
हेही वाचा: Latur : जळकोटच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या प्रभावती कांबळे
यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला. मृत द्वारकानाथ मद्रेवार हे अत्यंत मनमिळाऊ व्यापारी म्हणून परिचीत होते. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
Web Title: Accident Take Place On Latur Nanded Highway Young Trader Died
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..