विहिरीत बुडून दोघांचा अपघाती मृत्यू

preview.jpg
preview.jpg
Updated on


वाई बाजार, (ता.माहूर जि. नांदेड) ः माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलिस ठाणे हद्दीतील दहेली तांडा तालुका किनवट येथील मरहूम उस्मान दिवानजी यांच्या शेतात पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना आज (ता.१८) रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास देहली तांडा येथे घडली.

दोघाही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू 
सिंदखेड पोलिस ठाण्यात रमेश दगडू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे दहेली तांडा गावातील नासिर खान नुरखान पठाण (वय २०) व शुभम गणेश पवार (वय २०) हे दोघे उस्मान दिवानजी यांच्या शेतातील विहीरीत पाणी पिण्या साठी गेले असता पाय घासरून विहिरीत पडल्याने या दोघाही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोघांवर ही देहली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. संदीप जाधव, डॉ.दिलीप मंडलवार यांनी शवविच्छेदन केले.


दहेली तांडा गावावर शोककळा
पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण, पोलिस हेडकॉन्स्टेबल भारत राठोड, दारासिंग चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक झमाखान पठाण हे करीत आहे. या घटनेतील मयत दोन्ही मुले आप आपल्या आई वडिलांना एकुलती एकच होती. या हृदयद्रावक दुर्दैवी घटनेमुळे दहेली तांडा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे.

देगलूरचा पोलिस कर्मचारी निलंबित
महामार्गावर थांबून ये- जा करणाऱ्या मालवाहतूक ट्रकला अडवून चालकांकडून हप्ते मागणाऱ्या पोलिस कर्मचारी खुशाल तुपदाळे याला निलंबित केल्याचे आदेश पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी शनिवारी (ता.१८) सकाळी काढले.
नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार सलीम बेग याने विनापरवानगी तेलंगणात जावून आपले कुटूंब आणून त्यांची वैद्यकीय तपासणी न करता पोलिस वसाहतीतील घरी आणले. वरिष्ठांची परवानगी न घेता व बंदोबस्त असताना त्याने कर्तव्य पालन न केल्याने ता. १५ एप्रिलला निलंबित केले होते. ही घटना ताजी असतानाच देगलुर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई खुशाल परमेश्‍वर तुपदाळे हा शासकीय वाहन घेऊन देगलुर ते नर्सी रस्त्यावरून मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला आडवून चालकांकडून पैसे मागत असल्याचा अहवाल देगलुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान धडबडे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे यांच्याकडे पाठविला. यावरून श्री.सरवदे यांनी यात तथ्य तपासून पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे अहवाल पाठविला. चौकशीत तथ्य आढळल्याने श्री. मगर यांनी खुशाल तुपदाळे याला निलंबित केले आहे. तो कोणाच्या सांगण्यावरून हप्ते मागत होता याचीही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. एका आठवड्यात दोन पोलिसांना निलंबित केल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com