ऊसतोड कामगाराच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीना शिक्षा व्हावी, ग्रामस्थांचे निवेदन

आदम पठाण
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

वडापुरी - हिंजवडी - कासारसाई येथे गेल्या आठवड्यात मराठवाड्यातून उस तोड कामासाठी आलेल्या कामगारांच्या दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाना व आरोपीना शिक्षा व्हावी व या दुर्घटनेतील कुटुंबियांना २५ लाखांची अर्थिक मदत देण्यात यावी याचे निवेदन इंदापुर तहसीलदार सोनाली मेटकरी व पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांना लाखेवाडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. 

येथील दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी औषधोपचारार्थ रुग्णालयात दाखल आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखेवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते व त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब उगलमोगले, युवासेना जिल्हा चिटणीस सुरज सानप, युवाध्यक्ष संदीप चौधरी, हनुमंत सानप, संदिप साबळे, पंढरीनाथ थोरवे, अरुण भिंगारदिवे, प्रल्हाद ढोले, सोमनाथ ढोले, पोपट ओंबासे, सुर्यकांत खाडे, दत्तू नांगरे उपस्थित होते. 

गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार केलेल्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, तसेच या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून अॅड.उज्वल निकम यांना शासनाच्या वतीने प्राधिकृत करावे व खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, याच बरोबर पिडीत कुटुंबियांना लवकरात लवकर अर्थिक मदत देण्यात यावी यासा निवेदनात म्हटले आहे.

Web Title: The accused should be punished for the abuse of the girl