Phulambri News : सातबाऱ्यावर खोटी नोंद घेणाऱ्या तलाठी मंडळ अधिकाऱ्याचे काय?

फुलंब्री येथील गट नंबर 17 मध्ये बनावट एनए प्रकरणमध्ये बिल्डर आणि डेव्हलपर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
crime
Crimesakal
Updated on

फुलंब्री - फुलंब्री येथील गट नंबर 17 मध्ये बनावट एनए प्रकरणमध्ये बिल्डर आणि डेव्हलपर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु सातबाऱ्यावर खोटी अकृषकची नोंद घेणाऱ्या तात्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्याच्यावर वरदहस्ता कोणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बनावट एन. ए. प्रकरणात बिल्डर व डेव्हलपर जेवढे दोषी आहे तेवढेच दोषी खोटी नोंद घेणारे तात्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.

फुलंब्री शहरातील सिल्लोड रस्त्यावर गट नंबर 17 मध्ये गटाची फोड करून 17/1 तयार करण्यात आला. त्यांनतर 17,872 चौरस मीटर अकृषिक निवासी क्षेत्र, खुली जागा 2,360 तर प्लॉट अंतर्गत रस्त्यासाठी 336 चौरस मीटर अकृषिकची नोंद सातबारावर घेण्यात आली होती.

सदरील एन.ए. हा 2014 पासून त्याचा फेर 2017 मध्ये घेण्यात आला. आणि 2017 - 2018 आणि 2019 या कालावधीत मोठ्या प्रमाणात येथील प्लॉट विक्री करण्यात आले. विक्री करीत असताना याच कालावधीत सिल्लोड रस्त्यावरील मुख्य महामार्गावरच मोठमोठाले होल्डिंगसह उपविभागीय अधिकारी यांचा एन.ए 44 चे लेआउटचे फ्लेक्स लावण्यात आले होते.

त्यामुळे प्लॉट घेणाऱ्या लाभार्थ्यांनी पहिला सातबारा काढून सातबाऱ्यावर अकृषक क्षेत्राची नोंद तपासली आहे. त्यानंतर संबंधित बिल्डर आणि डेव्हलपर यांच्याकडून उपविभागीय अधिकारी यांची नक्कल पाहिली. त्यानुसारच सुमारे दीडशे प्लॉट धारकांनी येथे प्लॉट खरेदी केले. या लेआउट मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी संख्या आहे.

तालुक्यातील शहराच्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी नागरिकांनी गुंतवणूक केली होती. सदरील गुंतवणूक करीत असताना पैसे नसल्याने अनेक प्लॉट धारकांनी गावाकडे जमीन विकून, घरातील महिलांचे दागिने मोडून, तर काहींनी खाजगी बँकांचे कर्ज काढून हा प्लॉट खरेदी केला होता.

परंतु आता याचा एन.ए लेआऊटच बोगस असल्याने प्लॉट धारकांना मोठा धक्का बसला आहे. परिणामी बिल्डर व डेव्हलपर या दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु सातबारावर नोंद घेणाऱ्या तात्कालीन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

2014 च्या एन.ए.44 चा 2018 मध्ये फेर -

फुलंब्री शहरात जून 2015 मध्ये नगरपंचायत अस्तित्वात आली. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर 2018 मध्ये गट नंबर 17 गटाची फोड करून 17/1 करण्यात आले. त्यानंतर त्याची बनावट 2014 ची एन ए-44 ची ऑर्डर तयार करून लेआउट टाकण्यात आले.

1 मार्च 2018 रोजी तत्कालीन तलाठ्यांने फेर ऑनलाइन केला. तर 13 मार्च 2018 या दिवशी मंडळ अधिकाऱ्यांनी फेर मंजूर केला. या बनावट एन.ए 44 ची नोंद तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी कशाच्या आधारावर घेतली हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सहा लाखापासून कोट्यावधी रूपयापर्यंत प्लॉटची विक्री -

शहरातील गट नंबर 17 मधील प्लॉटच्या साईजनुसार सहा लाखापासून ते वीस लाखापर्यंत येथे प्लॉट सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेला आहे. सिल्लोड रोडवर असणारे चार प्लॉट हे प्रत्येकी सुमारे पाच हजार स्क्वेअर फुट असल्याने प्रत्येक प्लॉट कोट्यावधी रुपयात विक्री करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फुलंब्री शहरातील गट नंबर 17 मध्ये बनावट एन ए प्रकरणी बिल्डर आणि डेव्हलपरवर गुन्हे दाखल झालेले आहेत. या एन.ए. 44 ची आणि सातबारावर नोंद कशी घेतली याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीमध्ये कोणी दोष आढळल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर कारवाई केली जाईल.

- संजीव राऊत, प्रभारी तहसीलदार फुलंब्री

मागील पाच-सहा वर्षापासून सदरील प्लॉट धारक त्रस्त आहे. आणि आता एका सहकार्याने एसडीएम कार्यालयातून एन.ए. ची नक्कल मागितली असता नोंदच नसल्याचे कळाले. त्यामुळे आमची प्लॉट धारकांची मोठी फसवणूक झाली आहे. प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा.

- डॉ. दुर्गा तांदळे, प्लॉट धारक.

शहरातील गट नंबर १७ मध्ये बोगस एन.ए असल्याचे लक्षात आले आहे. मग सातबाऱ्यावर अकृषकची नोंद कशी घेण्यात आली हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे दोषीवर कारवाई करून आम्हा प्लॉट धारकांना न्याय द्यावा.

- योगेश जाधव, प्लॉट धारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com