
लातूर: चालत्या बसमध्ये बारावी भौतिकशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्याच्या हालचाली विभागीय मंडळाने सुरू केल्या आहेत. यासंदर्भात संबंधित पोस्ट बेसिक आश्रम शाळेचा शिक्षक व मुख्याध्यापकाला मंडळातर्फे शिस्तभंगाच्या कारवाईबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशीही होणार आहे. यासंदर्भात ‘सकाळ’ने बुधवारच्या (ता. पाच) अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.