esakal | कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर रहावे : डॉ.प्रज्ञाताई सातव
sakal

बोलून बातमी शोधा

varanga

कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर रहावे : डॉ.प्रज्ञाताई सातव

sakal_logo
By
मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा : प्रत्येक गाव पातळीवर बुथ निहाय कार्यकर्त्यांची समिती गठित करण्यात येत आहे. या समितीमधील कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या समन्वयाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी तत्पर राहावे असे आवाहन काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञाताई सातव यांनी वारंगा येथे आयोजित बैठकीत बूथ कमिटी सदस्यांना मार्गदर्शन करताना शनिवारी केले.

वारंगा येथे आयोजित बैठकीस माजी आमदार डॉ.संतोष टारफे,जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्यासह जि.प सदस्य दिलीप देसाई,कैलाश साळुंके,सतिश पाचपुते,भगवान खंदारे,संतोष राजेगोरे,शेख सलीम,दत्तराव कदम,शेख कलीम,नितीन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत आखाडा बाळापूर,पोत्रा, डोंगरकडा, शेवाळा, येहळेगाव तुकाराम, वारंगा या सात जिल्हा परिषद सर्कल मधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यां कडुन आढावा घेण्यात आला.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

या आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना डॉ.प्रज्ञाताई पुढे म्हणाल्या की येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूकां करिता काँग्रेसचे पक्ष संघटन अधिक बळकट करणे हे एकमेव उद्दिष्ट मनाशी बाळगून काम करावे राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाने नेहमीच समाजकारणाला प्राधान्य दिले आहे त्यामुळे पक्ष संघटनेचे काम बळकट करताना नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या वरिष्ठ नेत्यांच्या समन्वयातून सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशिल रहावे असे आवाहन यावेळी प्रज्ञाताई सातव यांनी केले. बैठकीस श्री. खुडे ,श्रीनीवास मुंडे,दिलीप डुकरे,डॉ.ईसा,डॉ.तज्जमुल पटेल,देवानंद मुलगिर,पाशा पटेल,ओम कदम,साहेबराव जाधव,नामदेवराव चव्हाण,ओम पाटील,नंदकिशोर कदम,श्रीकांत पतंगै,गोरख पानपट्टे,संदीप घोटे पाटील, गजानन काळेवार,मधुकर बोथिकर,देविदास देशमुख,संजय लोमटे,अच्युत बोंढारे,सुरेंद्र सुर्यवंशी,अशोक पतंगे,सुरेश खडके,संदीप जाधव, अमोल चव्हाण ,संजय लोमटे,अवधुत लोमटे, रमेश कनके,विशाल राजेगोरे,साहेबराव जाधव अमोवाल चव्हाण कपिल पानपट्टे आदींची उपस्थिती होती.

loading image
go to top