विवाह सोहळ्यातील जोडप्यांना अक्षय कुमारचा लाख मोलाचा आहेर

विवाह सोहळ्यातील जोडप्यांना अक्षय कुमारचा लाख मोलाचा आहेर

परळी (जि. बीड) : विवाह सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींकडून वर - वधू पित्यांना आहेर वा भेट देण्याची पद्धत आहे. सध्या दुष्काळाने होरपळत असलेल्या वधू पित्यांचा लग्नाचा खर्च वाचावा यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. या विवाहासाठी वऱ्हाडी म्हणून आलेला आघाडीचा अभिनेता अक्षयकुमार याने नवदाम्पत्याला प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली. ही मदत एकूण 79 जोडप्यांना करण्यात येणार आहे.

शहीद जवानांसाठीही एक कोटीची मदत
अक्षय कुमारने यावेळी पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांसाठीही मदत म्हणून एक कोटी रुपयांची घोषण केली. 

मुख्यमंत्री फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार परळीत

परळी येथे शुक्रवारी सायंकाळी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अक्षय कुमार प्रमुख पाहुणे आहेत. सायंकाळी दोघांचेही परळीत आगमन झाले.

दरम्यान, शहरात सकाळपासूनच या सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्याची लगीनघाई होती. विविध धर्मपद्धतीने टप्प्याटप्प्याने मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन व सायंकाळी हिंदू धर्मिय दाम्पत्यांचा सामुहिक विवाह सोहळा पार पडला. सोहळ्याला वऱ्हाडी म्हणून आलेल्या अक्षय कुमार याने या दुष्काळग्रस्त नवदाम्पत्याच्या संसाराला मदत म्हणून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com