

A farmer from Gevarai Agalawe in Paithan allegedly died by suicide after remaining under stress over ₹8 lakh stuck in a cooperative credit society. Police are investigating the case.
Sakal
आडूळ : आडूळ येथील आदर्श सहकारी नागरी पतसंस्थेतील कथित घोटाळ्यात आठ लाख रुपयांची आयुष्यभराची बचत अडकल्याच्या धक्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. ५) पहाटे गेवराई आगलावे (ता. पैठण) येथे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित पतसंस्थेविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.