Video : परभणीत व्यापाऱ्यांची शक्कल; दुकानांसमोर दोऱ्यांचे जाळे !

file photo
file photo
Updated on

परभणी : कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर संपूर्ण जग हादरले आहे. या विषाणूवर अद्याप कोणती लस निघालेली नसली तरी यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय आहे. तब्बल ६५ दिवसांच्या टाळेबंदीनंतर दोन दिवसांपूर्वी परभणी शहरातील बाजारपेठ उघडली. आता बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे वापर व्हावा, यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी निरनिराळ्या युक्त्या लढवून उपाययोजना केल्या आहेत.

कोरोना विषाणू संसर्गानंतर देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली. कोरोना विषाणूचा संसर्ग टळावा यासाठी अद्यापही कोणतीही औषधी किंवा लस तयार झालेली नाही. कोरोनापासून स्वतःचा व समाजाचा बचाव करायाचा असेल तर केवळ सोशल डिस्टन्सिंगचा वापर हा एकमेव पर्याय आहे. परभणी शहरातही सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्यासाठी व्यापाऱ्यांनी निरनिराळ्या उपाययोजना राबविल्या आहेत.

सॅनिटाझरची व्यवस्था

काही व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानांसमोर दोऱ्यांचे जाळे तयार करून घेतले आहे. जेणे करून एक मीटरचे अंतर राखले जाईल. ग्राहक थेट दुकानात न येता सरळ वस्तूची मागणी करतील. दुकान मालक व दुकानावरील कर्मचारी दुकानात राहून आतून वस्तू देत आहेत. एका मेडिकल स्टोअर्स व्यापाऱ्याने तर दुकानाच्या काऊंटरपासून एक मीटर लांब लाकडी अडथळा लावला असून एका लांब व मोठ्या खोक्याच्या मदतीने औषधी दिली जात आहेत. त्याच खोक्यात वस्तूंची रक्कमदेखील घेतली जात असून पैशावर आधी सॅनिटायझर मारून नंतरच पैसे गल्ल्यात टाकले जात आहेत. काही मोठ्या व्यापाऱ्यांनी दुकानाच्या बाहेर सॅनिटाझरची व्यवस्था केली आहे. काहींनी ताप मोजण्याचे यंत्रदेखील आणले आहे. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची नोंद घेण्याचे कामदेखील केले जात आहे.

सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय?
सोशल डिस्टन्सिंग म्हणजे फक्त जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आणि बाहेर काही काम असेल तरच घराबाहेर पडणे होय. जेव्हा लोक घरी स्वतःचे विलगीकरण करतात तेव्हा ते संसर्ग होण्यापासून सुरक्षित राहतात. सोशल डिस्टन्सिंगचा सराव करणारा एखादा माणूस स्वत:ला वाचवू शकतो. परंतु, याचा सराव करणारा संपूर्ण समाज या विषाणूचा संसर्ग एकत्रितपणे पूर्णपणे थांबवू शकतो. 

ग्राहकांच्या तापमानाची तपासणी
आम्ही आलेल्या ग्राहकांची नावे नोंद करून त्यांना अगोदर सॅनिटाझर देऊन नंतरच दुकानात प्रवेश देत आहोत. तसेच आमच्या दुसऱ्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांचे तापमानदेखील तपासले जात आहे.
- विकास वट्टमवार, कापड व्यापारी, परभणी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com