शेतकऱ्यांनी रोखले आदित्य ठाकरेंना, पण का?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

 चिकलठाणा भागात महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना परिसरातील शेतकऱ्यांनी अडवत आपली कैफियत मांडली.

औरंगाबाद : चिकलठाणा भागात महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना परिसरातील शेतकऱ्यांनी अडवत आपली कैफियत मांडली.

महापालिकेतर्फे कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नसल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी वाढली असून, कुत्र्यांचा त्रास होत आहे. पदाधिकारी अधिकारी आश्वासनावर  बोळवण करत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यावर ठाकरे यांनी तुमचा नंबर द्या, इथे कुणाला बोलू नका मी तुम्हाला फोन करतो असे सांगत स्वतःची सुटका करून घेतली. दरम्यान व्यथा मांडणाऱ्या काही शेतकऱ्यांना शिवसेनेच्या नगरसेवकांनी रोखल्यामुळे वाद निर्माण झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray stopped by farmers, but why?