

Aditya Thackeray Inspects Cotton Crop In Kannad Aurala As Farmers Demand Pending Crop Insurance And Food Grain Supply
esakal
कन्नड: “साहेब, कपाशीचे हे पीक पाहा. एकरी पाच हजार रुपयेही उत्पन्न मिळणार नाही. डोंगरापर्यंतचा परिसर पाहिला तर ८० टक्के शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना मिळणारे धान्यही बंद झाले आहे. ते पुन्हा सुरू करून द्यावे. उसने आणि व्याजाने पैसे घेऊन पीकविमा भरला आहे. त्यामुळे विम्याची रक्कम लवकर मंजूर करावी. मागील २०२४-२५ च्या हंगामातील विमाही अद्याप मिळालेला नाही,” अशा शब्दांत औराळा येथील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.