- संतोष निकम
कन्नड - मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ विकास अंतर्गत कन्नड तालुक्यातील ४ रस्त्यांची दर्जान्नोती करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेली प्रशासकीय मान्यता राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडुन रद्द करण्यात आल्याचा नवीन शासन निर्णय गुरुवारी (ता. ७) रोजी जारी करण्यात आला. तो शासन निर्णय समाजमाध्यमावर येताच तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करता आहे.