

Sand Mafia Raj in Nilanga: Authorized Contractor Demands Refund of ₹22 Lakhs
Sakal
निलंगा : अवैध वाळू तस्करी करून मोठ्या प्रमाणात पैसा कमावण्यचे प्रकार सध्या वाढले असून चोरट्या मार्गाने वाळू उत्खनन रोखण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही कांहीच उपयोग होत नाही प्रशासनाला आता ही बाब नित्याचीच झाली आहे. मात्र वाळू उपसा करण्याचे अधिकृत टेंडर सुकल्यानंतरही त्या वाळूवर 'डल्ला' मारत असल्याचा प्रकार शिऊर ता. निलंगा येथील वाळू घाटावर उघड झाला असून अधिकृत ठेकेदारानी थेट याबाबत तहसीलदाराकडे तक्रार केली असून याबाबत अद्याप कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे माझे वाळू लिलावात भरलेले पैसे परत द्या अशी मागणी त्यांनी थेट जिल्हाधिकारी केली आहे. लाखो रुपये अधिकृत टेंडर सुटल्यानंतर भरूनही वाळू मिळत नसेल तर काय उपयोग असा हताश सवाल त्यांच्याकडून केला जात आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला थेट केराची टोपली दाखवण्यात येत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात निलंगा तालुक्यात वाळू चोरीचा प्रकार सुरू असल्यामुळे याला प्रशासनाचे अभय असल्याची उलट सुलट चर्चा सुरू आहे.