

Social activist Sachin Chavan has launched an indefinite hunger strike outside the Adul Gram Panchayat office in Paithan taluka, demanding an impartial inquiry into alleged financial irregularities and action against those found responsible.
Sakal
आडूळ : पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी गावातील तरुणांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायतीविरोधात एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून जामवाडी तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ४) ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. संबंधित कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.