Paithan Village Protest: आडूळ ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रकरणात १५ दिवसांत चौकशीचा अहवाल देण्याचे लेखी आश्वासन; सचिन चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

आडूळ ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहारावर १५ दिवसांत सखोल चौकशीचे लेखी आश्वासन; वाढत्या जनसमर्थनामुळे प्रशासनाला कारवाईचे वचन
Social activist Sachin Chavan withdrew his indefinite hunger strike after the administration assured in writing that the alleged financial irregularities in Adul Gram Panchayat would be investigated and a report submitted within 15 days

Sakal

Updated on

आडूळ : पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर गुरुवारी (ता. ६) प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले. कथित गैरव्यवहाराची १५ दिवसांत सखोल चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com