

Burglary in Adul: Jewelry Worth ₹1.04 Lakh Stolen from Trader's House
Sakal
आडूळ : आडूळ परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे १ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी (ता. ९) रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेसह पाचोड पोलीस तपास करत आहेत.