दोन महिन्यांत होणार नवीन विमानसेवा सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

औरंगाबादेतून दोन महिन्यांत औरंगाबाद-दिल्ली, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दहा विमान कंपन्यांच्या सदस्यांनी बुधवारी (ता.१०) दिले.

औरंगाबाद - औरंगाबादेतून दोन महिन्यांत औरंगाबाद-दिल्ली, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दहा विमान कंपन्यांच्या सदस्यांनी बुधवारी (ता.१०) दिले.

औरंगाबादेतून विमानसेवा वाढविण्यासाठी दिल्लीत नागरी उड्डयण मंत्रालयाच्या सचिवांसमवेत केंद्रीय राज्यमंत्री व विमान कंपन्यांची बैठक झाली. या बैठकीत एअर एशिया, एअर इंडिया, झूम एअर, गो एअर, स्पाईस जेट, इंडिगो, अल्काईन एअर या विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दिल्ली-औरंगाबाद-पुणे, दिल्ली- औरंगाबाद-बंगळुरू, औरंगाबाद-अहमदाबाद या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली. आगामी दोन महिन्यांत सेवा सुरू करणार असल्याचेही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, नागरी उड्डयण मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंग खरोला, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, राम भोगले, जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे, उद्योजक व भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर, किरण जगताप, नारायण पवार, सतीश लोणीकर, अनिल मकरिये, प्रमोद राठोड, दिलीप थोरात, रामेश्‍वर भादवे, वरुण कराड उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aeroplane Service Start in Two Months